Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची महावितरणकडून होळी

महावितरणच्या विरोधात शेतकरी आक्रमक

अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावात महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेच्या तारा एकत्र होऊन जनावरां

कर्मवीर बहुजनांच्या शिक्षणाचे आधारवड ः आ.आशुतोष काळे
शाळा कॉलेजच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे
सरकारी कामात अडथळा…दोघांना कारावास

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावात महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेच्या तारा एकत्र होऊन जनावरांच्या चाऱ्याला भीषण आग लागली आणि आगीत शेतकरी आण्णा हांडे व बाबाजी हांडे ह्यांचा लाखो रुपयांचा सुमारे आठ ते दहा ट्रॉल्या चारा जळून खाक झाला आहे. विजेच्या दोन पोल मध्ये खूप अंतर असल्याने ही लपटी झाली. ह्या दोन पोल मध्ये २०० मीटर पेक्षा जास्त अंतर आहे हे अंतर कमी करण्यासाठी अजून एक पोल महावितरणने टाकावा लागत होता. परंतु वारंवार सांगून ही महावितरणने दखल घेतली नाही असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी महावितरणवर केला आहे. आम्ही सदरच्या घटनेबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे आणि चोवीस तासाच्या आत पंचनामा करावा, अशी विनंती महावितरणला केली आहे असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

COMMENTS