Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थसंकल्पात निधीवाटपात भाजपचा वरचष्मा

सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वाधिक 19 हजार 491 कोटींचा निधी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा वर्षाव केला असला तरी, कोणत्या विभागाला किती निधी दिला, य

केरळमध्ये वाढला निपाहचा धोका वाढला
कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची सुटका
बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत महिला साहित्य संमेलनाचा समारोप 

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा वर्षाव केला असला तरी, कोणत्या विभागाला किती निधी दिला, याची चर्चा सुरु असून, निधीवाटपात भाजपचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सर्वाधिक 19,491 कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री फडणवीस यांनी शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये, महिलांना एसटी बसच्या प्रवासात सूट, व्यवसाय करासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र यासोबतच भाजपकडे असलेल्या खात्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाला 9725 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहविभागाला 2187 आणि वित्त विभागाला 190 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडे असलेल्या उद्योग विभागाला 934 तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असलेल्या महसूल विभागाला 434 कोटी रुपयांची तरतूद चालू आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1920 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारमधील निधीवाटपावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाला 1085 कोटी, मराठी भाषा विभागाला 65 कोटी, विधी आणि न्याय विभागाला 694 कोटी, माहिती व जनसंपर्क विभागाला 1342 कोटी, वस्त्रोद्योग विभागाला 708 कोटी, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाला 738 कोटी, शालेय शिक्षण विभागाला 2707 कोटी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला 2355 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला आहे. क्रीडा विभागासाठी 491 कोटी, पर्यटन विभागाला 1805 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाला 19,491 कोटी, ग्रामविकास विभागाला 8490 कोटी, रोजगार हमी विभागाला 10, 297 कोटी, परिवहन आणि बंदरे विभागाला 3746 कोटी आणि सामान्य प्रशासन विभागाला 1310 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू आर्थिक वर्षासाठी केली आहे.

COMMENTS