Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचे फुलोरे – अजित पवारांची टीका

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर टीका कर

हळदी समारंभासाठी रस्ता अडवला, नवरदेवावर गुन्हा
गाळप, साखर उत्पादनात सोलापूर दुसऱ्या स्थानी
भंडारदर्‍याच्या काजवा महोत्सवाची जय्यत तयारी

मुंबई/प्रतिनिधी ः शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर टीका करतांना म्हटले आहे की, हा अर्थसंकल्व म्हणजे शब्दांचे फुलोरे असून, ’लबाडाच्या घरचे आवतान जेवल्याशिवाय खरे मानायचे नाही’, असे या अर्थसंकल्पाचे वर्णन करता येईल. राज्यात सत्तांतर झाल्यापासून तरुणांना 75 हजार नोकर्‍या दिल्या जाणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु नोकरभरतीचे काय झाले, हे अद्याप कळलेले नाही. अर्थसंकल्पात रोजगाराबाबत अर्थमंत्र्यांनी काहीही म्हटलेले नाहीये. उद्योगधंदे महाराष्ट्रात यावेत, यासाठीही बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचे सांगत अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी आम्ही करत आहोत, परंतु सरकारने शेतकर्‍यांसाठी अद्याप कोणतीही ठोस घोषणा केलेली नाहीये. शेतकर्‍यांना पैसे देण्यात आल्याचे खोटी वक्तव्ये सत्ताधार्‍यांकडून केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली होती. आता सत्ताधारी ती योजना पुन्हा सुरू करण्याचे म्हणत आहेत. त्या योजनेचा लाभ किती शेतकर्‍यांना मिळाला नाही, त्याचे आकडे मात्र देण्यात आलेले नाहीत, शिंदे-फडणवीस सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचा घणाघात अजित पवारांनी केला आहे.

हा तर गाजर-हलवा अर्थसंकल्प ः उद्धव ठाकरे – अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर-हलवा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना मधाचे बोट लावण्याचा, त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाला आणि मुंबईत गडगडाट झाला. गरजेल तो पडेल काय असे म्हणतात तसा हा अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली.

शेतकर्‍यांना अर्थसंकल्पात मदतीचा भोपळा ः नाना पटोले अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून केवळ मोठमोठ्या आकड्यांची घोषणा असे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शेतमालाच्या हमीभावाबद्दल अर्थसंकल्पात काहीही नाही, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीची घोषणा नाही, तसेच जुन्या पेन्शनबद्दलही अर्थसंकल्पात कोणतेही सुतोवाच केलेले नाही. हा अर्थसंकल्प अर्थहीन आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

हे तर, चाट मसाल्याचे बजेट ः राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या अर्थसंकल्पाला ’चाट मसाल्याचे बजेट’ म्हटले आहे. तेवढ्यापुरते चविष्ट लागते. मात्र अंतिमतः हाताला काही लागत नाही अशी स्थिती या बजेटची आहे. 6 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान अर्थमंत्र्यांनी जाहीर केला, रासायनिक खतांमध्ये तब्बल 17 ते 18 हजार रुपयांची वाढ झालीय. याकडे लक्ष न देता आमचे अर्थमंत्र्यांनी आम्हाला केवळ 6 हजार रुपये देत आहेत. म्हणजे अजून 10 हजारांनी शेतकरी तोट्यातच असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

COMMENTS