Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 खामगावात ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट’ केंद्राला मान्यता, जखमी वन्यप्राण्यांवर होणार उपचार

बुलढाणा प्रतिनिधी - वन्य संपदेचे वरदान लाभलेल्या  बुलढाणा जिल्ह्यातील वन्यजीव विभाग  व लाखो वन्यजीव प्रेमींसाठी एक 'गुड न्यूज' आहे. जिल्

तांबवे पुलानजीकच्या नदीपात्रात सापडले जिवंत बॉम्ब
यंदा 50 हजार गोविंदांना मिळणार विमा संरक्षण
महिलांची श्रम सुसह्यता हाच उज्वला’चा हेतू!

बुलढाणा प्रतिनिधी – वन्य संपदेचे वरदान लाभलेल्या  बुलढाणा जिल्ह्यातील वन्यजीव विभाग  व लाखो वन्यजीव प्रेमींसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. जिल्ह्यातील जायबंदी वन्यप्राण्यांना  उपचारासाठी शेकडो किलोमीटर अंतरावर नेण्याची गरज राहणार नाही आहे. याचे कारण आता लवकरच खामगाव तालुक्यात कोलकत्ताच्या धर्तीवर अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी साडेदहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामुळे जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबरवा व लोणार अभयारण्य मधील जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना शेकडो किलोमीटर अंतरावरील नागपूर वा पुणे येथे नेण्याची गरज राहणार नाही. यामुळे त्यांना जीवनदान मिळण्याची जास्त शक्यता राहणार आहे.

खामगांव विधानसभा मतदार संघात बुलढाणा प्रादेशिक वन विभाग खामगांव वनपरिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. तसेच जळगाव जामोद मतदारसंघात अंबाबरवा अभयारण्य आहे. याशिवाय लोणार सरोवर परिसरात संरक्षित क्षेत्र आहे.  शेकडो हेक्टर मध्ये पसरलेल्या या जंगलात बिबट, अस्वल, काळविट, निलगाय, साळींदर, अस्वल, मोर,  अनेक प्रकारचे संरक्षीत पशुपक्षी आहेत. नैसर्गिक कारण वा मानवी अपघातामुळे अनेक वेळा  प्राणी जखमी किंवा आजारी असतात. या प्राण्यांना योग्य उपचार न मिळल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागतात. यासाठी खामगांव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी खामगांव येथे नवीन ‘ट्रान्सीट ट्रिटमेंट सेंटर’  स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सुचना केली होती. खामगांव तालुक्यातील जनुना येथे मंजूर हे आधुनिक उपचार केंद्र मंजूर करण्यात आले आहे. सद्यस्थ‍ितीत दूरवरच्या नागपूर व पुणे येथेच वन्यजीवांना उपचारार्थ न्यावे लागते..त्यांना उपचारार्थ नागपूर अथवा पुणे येथे नेण्यास ३०० ते ५०० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचे जिवीतासहानी पोहचते. दुसरीकडे अभयारण्यात अस्वलांची मोठी संख्या आहे.  या अस्वलांच्या संरक्षणासाठी व उपचारार्थ विशेष सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सहाय्यक वन संरक्षक बुलढाणा यांनी डिसेंबर २०२२ मध्ये वनविभागास परिपुर्ण प्रस्ताव सादर केला होता.

COMMENTS