Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने संत्री फळबागेचे नुकसान

बीड प्रतिनिधी - मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसाने बीडच्या आष्टी तालुक्यातील मातकूळी गावात संत्रा फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. बापू झ

अन्यथा मरण अटळ
स्कॅनचे दर कमी केल्याने गरजूंना मिळणार दिलासा-डडीयाल
अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या अध्यक्ष सचिव यांचे कट कारस्थान चालूच ?

बीड प्रतिनिधी – मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसाने बीडच्या आष्टी तालुक्यातील मातकूळी गावात संत्रा फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. बापू झरे यांच्या साडेचार एकर क्षेत्रावरील संत्रा फळबागेचे फळे गळून पडली आहेत. तळ हाताच्या फोडाप्रमाणे चार वर्ष जरे यांनी ही फळबाग जोपासली होती. वेळप्रसंगी टँकरद्वारे पाणी देऊन त्याची जोपासना करण्यात आली. मात्र आज झालेल्या अवकाळी पावसाने फळबागेचं नुकसान केले आहे. पहिल्यांदाच झाडांना फळ बहरली होती. मात्र ऐन तोडणी वेळेस 15 टन संत्रा वाया गेली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताला भेट दिली असली तरी अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. या फळबागेतून जरे यांना 14 टन संत्री होणार होती. यातून जवळपास 25 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांच्या हाती येणार होते. मात्र अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे.

COMMENTS