Homeताज्या बातम्यादेश

यंदा निर्यात 750 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल ः मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या निर्यातीचा आकडा देशाने फेब्रुवारीमध्येच ओलांडला असून या वर्षी व्यापारी आणि सेवा निर्यात 750 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत

मारुती अल्टो फक्त २ लाखांत खरेदी करा.
आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविणार ः पालकमंत्री रवींद्र चव्हाण
कराड तालुक्यात वादळी वार्‍यामुळे नुकसान

नवी दिल्ली : गेल्या वर्षीच्या निर्यातीचा आकडा देशाने फेब्रुवारीमध्येच ओलांडला असून या वर्षी व्यापारी आणि सेवा निर्यात 750 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. ते नवी दिल्लीत रायसीना संवादाच्या 8 व्या आवृत्तीला संबोधित करत होते.
गेल्या वर्षात भारताने सर्वाधिक निर्यातीचा आकडा गाठण्याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना गोयल म्हणाले की, हा सखोल विश्‍लेषण आणि व्यापक नियोजनाचे परिणाम आहे. भारताच्या क्षमतांचे कसून मूल्यांकन केले गेले, नवीन बाजारपेठ शोधण्यात आली, विशेषत्वाने दुर्गम जिल्ह्यांना निर्यात केंद्र बनण्याचे अधिकार देण्यात आले, यासारख्या उपायांसह परदेशातील सर्व भारतीय मोहीमांचा व्यापार, तंत्रज्ञान आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रभावीपणे फायदा झाला, असे त्यांनी सांगितले. मंत्र्यांनी नमूद केले की, गेल्या वर्षी देशाने व्यापारी आणि सेवा व्यापार निर्यातीत 650 अब्ज अमेरिकी डॉलरचा आकडा ओलांडला होता. स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण भारतातील सुमारे 35 दशलक्ष घरांचे विद्युतीकरण, एक मजबूत पॉवर ग्रीड तयार करणे, सर्वांसाठी घरे, 500 दशलक्षाहून अधिक लोकांना मोफत आरोग्यसेवा यासारखे परिवर्तनात्मक उपक्रम सरकारने गेल्या दशकभरात हाती घेतल्याचे गोयल यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करत भारताला उच्च स्थानी पोहोचवण्यात या योजनांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे असे ते म्हणाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाचे कौतुक केले. साथीच्या संपूर्ण काळात पंतप्रधान मोदींनी केवळ साथीच्या रोगावर मात करण्यासाठीच नव्हे, तर आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सतत कल्पना शोधल्याचे त्यांनी सांगितले. या अशांत काळात भारताला आपली लवचिकता दाखवण्याची संधी मिळाली असे गोयल यांनी संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्‍चिततेच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. अन्न सुरक्षा हे जगासमोर एक गंभीर आव्हान बनले आहे असे गोयल यांनी स्पष्ट केले. खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्‍चित करून भारताची अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी योजना तयार करण्याची दूरदृष्टी पंतप्रधान मोदींकडे होती, असेही ते म्हणाले.

COMMENTS