लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी गुरज्योत सिंगला अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी गुरज्योत सिंगला अटक

प्रजासत्ताक दिनाला 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी वाँटेड असलेल्या गुरज्योत सिंगला स्पेशल सेलने पंजाबमधून अटक केली आहे.

साई समृद्धी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव आढाव
राजकीय सामना कोण जिंकणार ?
रेस्टॉरंटमधील माऊथ फ्रेशनरमुळे ५ जणांना रक्ताच्या उलट्या

अमृतसर : प्रजासत्ताक दिनाला 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी वाँटेड असलेल्या गुरज्योत सिंगला स्पेशल सेलने पंजाबमधून अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेने लाल किल्ल्यावर निशाण साहिबचा झेंडा फडकावल्याप्रकरणी गुरज्योतला अटक केली. त्याने लाल किल्ल्यावर मागील बाजूस असलेल्या घुमटावर चढून झेंडा फडकावला होता. त्यानंतर फरार असलेल्या गुरज्योतला अमृतसरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दीप सिद्धू, जुगरात सिंग, गुरज्योत सिंग यांची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. 

शेतकरी आंदोलनावेळी दिल्लीतील लाल किल्ल्यावर गोंधळ झाला होता. या प्रकरणी दीप सिद्धूसह इतर काही जणांविरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं. याआधी 17 मे रोजी 3 हजार 224 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सिद्धूसह 16 आरोपींविरोधात खटला चालवण्याची विनंती करण्यात आली होती. यात मुख्य सूत्रधार सिद्धूला 9 फेब्रुवारी रोजी अटक झाली होती. त्याच्यावर लाल किल्ल्यात गोंधळ माजवल्याचा आणि लोकांना भडकवल्याचा आरोप आहे. लाल किल्ल्यावर हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात आरोपपत्र दाखल केले होते. तीस हजारी कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आऱोपपत्रात सिद्धूसह जवळपास 16 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी लाल किल्ला परिसरात करण्यात आलेल्या कृत्याला देशविरोधी कृती असं म्हटलं आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या एका पथकाने घटनेनंतर लाल किल्ल्याची पाहणी केली होती. घटनेसंदर्भातील सर्व पुरावे एकत्र केले होते.

COMMENTS