Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नवीन पाईपलाईन  नागरिकांसाठी ठरतेय डोकेदुखी

बुलढाणा प्रतिनिधी - मुख्य रस्ते खोदून आठ दिवस झाले तरी टाकण्यात आली नाही पाईपलाईन.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान राज्यस्तर योजनेमार्फत

आठ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश
मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट
प्रकाश कामगारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग; पोलिसासह आरोग्य अधिकार्‍यांच्या बेकायदेशीर कारवाई विरोधात उपोषण

बुलढाणा प्रतिनिधी – मुख्य रस्ते खोदून आठ दिवस झाले तरी टाकण्यात आली नाही पाईपलाईन.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोत्थान राज्यस्तर योजनेमार्फत 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने 59.45 कोटींची बुलढाणा शहरात 158 किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे, मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नवीन पाईपलाईन टाकणे हे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतांना दिसतेय,ठेकेदाराकडून शहरातील मुख्य रस्ते आठ दिवस पासुन खोदून ठेवलेय असून पाईपलाईन टाकण्यात येत नाही.यामुळे या मुख्य रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रासाचा सामना नागरिकांना करावा लागतोय..शहरात अशाच प्रकारे पाईपलाईन टाकण्याचे काम शहरात संत गतीने सुरू असून ही नगर परिषदेच्या प्रशासनाकडून याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नगर परिषद आणि ठेकेदाराच्या प्रति संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS