Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉपीप्रकरणी केंद्र संचालकांसह नऊ शिक्षकांवर गुन्हा

पुणे ः दौंड तालुक्यात केडगाव येथील जवाहरलाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्रात मास कॉपी करण्यात आल्याचा प्रकार उघडकी

जामखेडला भेट देत जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी सुनावले खडे बोल
नितेश राणेंचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
अकोलेत डिझेलअभावी एसटीचे चाके थांबली

पुणे ः दौंड तालुक्यात केडगाव येथील जवाहरलाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्रात मास कॉपी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने कडक कारवाई केली. केंद्राचे संचालक जालिंदर नारायण काटे, उपसंचालक रावसाहेब भामरे, प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, कविता काशिद, शाम गोरगल, जयश्री गवळी, सुरेखा होन व अभय सोननवर या शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर परीक्षा कायदा 1982 च्या कलम 8 नुसार गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पुणे प्राथमिक विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी पोलिसांत तक्रार दिली.

COMMENTS