मुंबई ः ठाणे जिल्ह्यातले एक डॉक्टर आणि त्यांच्या तीन साथीदारांना 10 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून चेन्नईच्या कंपनीने एक कोटींहून अधिक र
मुंबई ः ठाणे जिल्ह्यातले एक डॉक्टर आणि त्यांच्या तीन साथीदारांना 10 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून चेन्नईच्या कंपनीने एक कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. डोंबिवलीजवळील सोनारपाडा गावात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच फसवणूक करणार्या ठगांचा शोध सुरू केला आहे.
डॉक्टर हर्षवर्धन ठाकूर यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार कंपनी, तिचे संचालक आणि फर्मशी संबंधित इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 420 (फसवणूक) आणि 406 (गुन्हेगारी भंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2020 मध्ये कंपनी आणि इतर आरोपींनी 10 कोटी रुपयांच्या कर्ज देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी अनेक हप्त्यांमध्ये 82.50 लाख रुपये घेतले, परंतु तरीही कर्ज दिले नाही. संबंधितांनी कंपनीशी संपर्क साधल्यानंतर 30.30 लाख रुपये परत केले. या कंपनीने अशाच प्रकारे इतर तिघांचीही फसवणूक केली आहे. ही फसवणुकीची रक्कम 1 कोटी 8 लाख 60 हजार रुपये आहे.
COMMENTS