Homeताज्या बातम्यादेश

लग्नाच्या दिवशी नवरीचा मृत्यू

वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

गुजरात प्रतिनिधी- गुजरातमधील भावनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सर्वत्र जल्लोषाचे आणि आनंदाचे

अवैध सावकारी..दोन लाखांच्या बदल्यात दिले बावीस लाख ,तरीही दुकान काबीज | LOK News 24
मणिपूरच्या घटनेने व्यवस्थेला चपराक
विद्यापीठ खेळाडूंना पुन्हा 25 वर्षाची अट; कोरोनामुळे दिलेली सवलत खंडित

गुजरात प्रतिनिधी- गुजरातमधील भावनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सर्वत्र जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. याच दरम्यान, अचानक आनंदावर विरजण पडले. नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भावनगर येथील राणाभाई बुटावई अलगोटार यांचा मुलगा विशाल याच लग्न जिनाभाई राठोड यांची मुलगी हेतल हिच्याशी ठरलं होतं. सर्वजण आनंदाने लग्नाची तयारी करत होते. भगवानेश्वर मंदिरासमोर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. घरात पाहुणे आणि नातेवाईकांची ये-जा सुरूच होती. संगीत वाजत होते. थोड्याच वेळात दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार होते. पण कदाचित नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळे ठेवले होते. लग्नाआधी हेतलचं डोकं दुखू लागलं. मोकळ्या हवेत श्वास घेता यावा म्हणून ती टेरेसवर पोहोचली पण तिथून खाली पडली. घरातील लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी हेतलचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की, हेतलला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे तिला वाचवता आले नाही. घरात मुलीच्या मृत्यूने शोककळा पसरली होती. यानंतर वधूच्या छोट्या बहिणीशी लग्न करण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही कुटुंबीयांनी अखेर हा निर्णय मान्य केला.

COMMENTS