Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासकामात राजकारण बाजूला ठेवत सर्वांना सोबत घेत गावाचा विकास करू – भोरू म्हस्के

पाथर्डी प्रतिनिधी - कोरडगाव ग्रामपंचायत अंतर्गत खंडोबानगर वस्तीवरील संत सेवालाल महाराज मंदीरासमोर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात य

कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ प्रकाशित करणार
नात्याला काळिमा…भावजयीवर अत्याचार, गुन्हा दाखल
वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळून पर्जन्यचक्र खंडीत : अभय आव्हाड

पाथर्डी प्रतिनिधी – कोरडगाव ग्रामपंचायत अंतर्गत खंडोबानगर वस्तीवरील संत सेवालाल महाराज मंदीरासमोर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या साडेचार लाख रुपयांच्या सभामंडपाचे भुमीपुजन वैष्णव आश्रमाचे महंत ह.भ.प.प्रविणमहाराज कोरडगावकर, सरपंच, उपसरपंच व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

     यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरु म्हस्के, ह.भ.प.नागेश महाराज, ग्रा.पं. सदस्य अशोक कांजवणे, रमेशदेवा जोशी, मा. सरपंच भाऊसाहेब फुंदे, विनायक देशमुख, एकनाथ ढोले, मल्हारी घुगरे, चंद्रकांत जाधव, विठ्ठल मासाळ, पांडुरंग वाळके, अंबादास फुंदे, गणेश मस्के, महादेव गोरे, रामभाऊ घुगरे, आसाराम बारगळ, कालुभाई शेख, हासिम शेख, रमेश मोरे, गणेश कचरे, जालिंदर मुखेकर, बबन मुखेकर, संभाजी मुखेकर, प्रभाकर काकडे, पंडित देशमुख, राम जाधव, परसराम जाधव, रहमान शेख, मेहबूब शेख, आशीर्वाद कचरे, गोटू धोत्रे, प्रकाश फुंदे, अण्णा दहिफळे, अली शेख, विकास गोरे, बाळासाहेब म्हस्के, गोविंद गोरे, अनिल जाधव, बद्रीनाथ वाळके, सुनील शिंदे, आकाश पवार, शंकर पवार, राजू राठोड, गणेश मुखेकर, योगेश मुखेकर, रामहरी फुंदे, जगन्नाथ वाळके, कृष्णा गोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

       यावेळी बोलताना सरपंच म्हस्के म्हणाले की, कोरडगाव सारख्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या गावाने विश्वास दाखवून सरपंच पद व पॅनलला ग्रामपंचायत कारभार करण्यासाठी जी संधी दिली त्या संधीचे आम्ही विकास व जनसेवेच्या माध्यमातून सोने करू.तसेच सर्व घटकांना सोबत घेत गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहू.गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून ती कामे करण्यासाठी आग्रही राहू.राजकारण हे फक्त निवडणुकी पुरते ठेवत गावाच्या विकासासाठी सर्वांच्या  मार्गदर्शनाने कारभार करू.तरी गावाच्या विकासासाठी सर्वांनीच सहकार्य करावे असे आवाहनही म्हस्के यांनी यावेळी केले. प्रकाश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले तर शहाबाज शेख यांनी आभार मानले.

COMMENTS