Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रंग रंगोटीतून बदलले शहराचे चित्र

स्थानिक कलाकारांना मिळाले व्यासपीठ

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद शहराला जी ट्वेंटी परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.  या संधीचं सोनं करण्याकरता जिल्हा प्रशासन मनपा प

पेन्शन धारकांनी केले धरणे आंदोलन, शेकडो निवृत्त कर्मचारी झाले संपात सहभागी
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
औरंगाबादमध्ये अभियंता अडकला हनीट्रपमध्ये

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद शहराला जी ट्वेंटी परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.  या संधीचं सोनं करण्याकरता जिल्हा प्रशासन मनपा प्रशासन व इतर शासकीय कार्यालय जोमाने कामाला लागले असून औरंगाबाद शहराचा यामध्ये कायापालट होताना दिसत आहे.  ज्या ठिकाणी कचऱ्याचे ठिकाणी घाण पडलेली आज त्या ठिकाणी कलावंत कलाकारांना बोलवून भिंतीवर चित्र रेखाटल्यामुळे शहराचे रूप बदलले आहे.  स्थानिक कलाकारांना या जी ट्वेंटी मुळे रोजगार मिळाला असून यामध्ये आम्हाला आमची कला सादर करण्याचा एक व्यासपीठही मिळाले असल्याचे चित्र काढणारे कलावंतांनी सांगितले आहे. यामुळे शहरातील शासकीय भिंतीला कॅनव्हास म्हणून उपयोग केलेला आहे व आमची कला सादर करून नागरिकांचे लक्ष वेधत आहोत जी ट्वेंटी च्या माध्यमातून आम्हाला एक प्लॅटफॉर्म सुद्धा मिळाला आहे.  व प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही यामध्ये शंभर पेक्षा जास्त चित्रकार मुली मुले आहोत अशी प्रतिक्रिया चित्रकार कलावंत यांनी दिली आहे. 

COMMENTS