मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या जबाब घेण्यासा
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या जबाब घेण्यासाठी म्हणून ठाणे पोलिसांचं विशेष पथक बुधवारी नाशिकमध्ये दाखल झाले होते.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी रात्री मला जीवे मारण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप करणारे पत्र मुंबई व ठाणे पोलिस आयुक्तांना पाठवले होते. त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर तातडीने राजकारणामध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपाकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे. आता त्यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर या बंदोबस्तातच बुधवारी संजय राऊत नाशिक मध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. सातत्याने संजय राऊत यांना होत असलेल्या विरोध आणि त्यांच्याविरुद्ध नाशिक मध्ये दाखल झालेला गुन्हा व झालेले आंदोलन या प्रकरणामुळे देखील नाशिकमध्ये बंदोबस्तात वाढ केल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मंगळवारी रात्री खासदार संजय राऊत यांनी जीवाला धोका असल्याचा केलेला गंभीर आरोप आणि दिलेले लेखी पत्र याची दखल ठाणे पोलीस आयुक्तालयाने घेतली असून ठाणे पोलीस आयुक्तालयाचे एक विशेष पथक सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्ये दाखल झाले आहे या पथकामध्ये सात अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत ठाणे पोलीस आयुक्तालय चे दोन वाहन या ठिकाणी हॉटेल एक्सप्रेस सीन या ठिकाणी दाखल झाले असून सातव्या मजल्यावरती खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.
COMMENTS