Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रियकरानेच केली प्रियसीची हत्या

अकोले/प्रतिनिधी ः अकोले तालुक्यातील शेंडी येथुन बेपत्ता असलेल्या मुलीचा प्रियकरानेच काटा काढला आहे. प्रियकर आरोपी हा प्राथमिक शिक्षक आहे. शिक्षकी

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकार करावे ः प्रा. बाबा खरात
हर्षवर्धन बोर्डे यांची वित्त आयोगाचे आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती
वेगात वाहने चालवणार्‍या दोघांना दणका, गुन्हे दाखल

अकोले/प्रतिनिधी ः अकोले तालुक्यातील शेंडी येथुन बेपत्ता असलेल्या मुलीचा प्रियकरानेच काटा काढला आहे. प्रियकर आरोपी हा प्राथमिक शिक्षक आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारा हा प्रकार अकोले तालुक्यात घडला आहे. शेंडी येथील खाडे या मुलीला नोकरीच्या नावाखाली गाडीत बसवुन आरोपींनी पळवून नेले होते. सदर मुलीची मिसींग राजुर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती.
राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पो.नि. गणेश इंगळे यांनी तांत्रीक तपास करुन नासिक येथुन एका आरोपीला अटक केल्यानंर प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सदर मुलीला वासळी येथील दत्तु धोंडु डगळे याने व त्याचा साथीदार मनोहर पुनाजी कोरडे यांनी शहापूर तालुक्यातील साकुर्ली परिसरातील एका दगडाच्या खाणीमध्ये मुलीला मारुन फेकुन दिले . सदर घटनेचा गुन्हा किनवली पोलिस स्टेशनला 17/1/2023 रोजीच दाखल करण्यात आलेला होता. अतिशय शांत पद्धतीने राजुर पोलिसांच्या टीमने काम करुन बेपत्ता असलेल्या खाडे हीच्या खुनाचा तपास लावला असून राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक ए.जे. शेख, पो. कॉ दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, विजय फटांगरे, विजय मुंडे, साईनाथ वर्पे, सुनील ढाकणे, कैलास नेहे, रोहीणी वाडेकर यांनी या तपासात भाग घेतला होता .राजुर पोलिसांच्या या  कामगिरीचे परीसरातुन कौतुक होत आहे.

COMMENTS