Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यापारी संकुलाचे आज खा. शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन

कर्जत प्रतिनिधी ः गेल्या काही वर्षामध्ये कर्जत शहरातील व्यवसाय व व्यापार झपाट्याने वाढत आहेत. मात्र शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणजेच व्यावसायिक ग

डॉ. अशोक सोनवणे यांचा संभाजी ब्रिगेडकडून सन्मान
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये विविध उपक्रम
समृद्धीच्या इंटरचेजच्या नावात कोपरगावचा उल्लेख टाळण्यामागे राजकारण – सुधाकर रोहोम

कर्जत प्रतिनिधी ः गेल्या काही वर्षामध्ये कर्जत शहरातील व्यवसाय व व्यापार झपाट्याने वाढत आहेत. मात्र शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणजेच व्यावसायिक गाळ्यांची कमतरता लक्षात घेवून आ. रोहित पवार यांनी नगरपंचायतींना वैशिष्ठयपुर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत तसेच महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग अंतर्गत 900.00 लक्ष रुपये व्यापारी संकुलासाठी मंजूर केले. या संकुलाच्या निर्मितीचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या शुभहस्ते तसेच आ. रोहित पवार, खासदार, विधान परिषद सदस्य व मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला आहे. मंगळवार, दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सध्याचे नगरपंचायत कार्यालय येथे संपन्न होत आहे.

या व्यापारी संकुलात एकुण 99 गाळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार व व्यापार्‍यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच कर्जत शहराची बाजारपेठ वाढणार आहे. सदगुरु गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिणद्वार म्हणून ओळख असलेले हे शहर आहे. करमाळा, इंदापूर, बारामती, दौंड, जामखेड आदी तालुके हे या शहरालगत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गासाठी हक्काचे व सुरक्षित असे व्यापारी संकुल बनवणे ही गरज ओळखून कर्जत नगरपंचायतअंतर्गत हे काम मार्गी लागत आहे. या संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नागरिक, व्यापारी बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले तसेच सर्व विषय समिती सभापती, गटनेते, उपगटनेते, नगरसेवक- नगरसेविका यांनी केले आहे.

COMMENTS