Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार तनपुरेंनी केली म्हैसगाव येथील पुलाची पाहणी

राहुरी/प्रतिनिधी ः म्हैसगाव येथील राज्य मार्गावरील पुलाची पहाणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. 2022 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये आमदार तनपुरे

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्‍वेतपत्रिका काढा
पोलिस ठाण्यांतून यापुढे…नो हॅपी बर्थ डे…
नपुर शर्माला समर्थन दिले म्हणुन तरूणावर झाला हल्ला.

राहुरी/प्रतिनिधी ः म्हैसगाव येथील राज्य मार्गावरील पुलाची पहाणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. 2022 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये आमदार तनपुरे यांनी या पुलाच्या कामासाठी सुमारे 1 कोटी 31 लाखांचा निधी मंजूर केला होता.
या कामाला आता प्रत्यक्ष सुरवात झाली असुन या भागात दौरा दरम्यान आमदार तनपुरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत या कामाला भेट दिली .  ठेकेदाराला चांगल्या दर्जाच्या कामाच्या सुचना देण्यात आल्या. या भागातील अनेक वर्षापासुन या पुलाची मागणी होती. आमदार तनपुरे विधानसभेत गेल्यानंतर मतदार संघाकरीता अनेक विकास कामांकरीता कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. या पुलाचे काम दर्जेदार व्हावे जेणेकरुन म्हैसगांव , शेरी चिखलठाण , दरडगांव थडी , कोळेवाडी आदि गावांच्या दळणवळणाचा महत्वाचा प्रश्‍न मार्गी या निमित्ताने मार्गी लागणार आहे. पावसाळ्यात अनेक अडचणीचा सामना या भागातील नागरीकांना व शालेय विद्यार्थ्याना करावा लागत होता. ह्या पुलाच्या कामाच्या निमित्ताने हा प्रश्‍न सुटणार असल्याने या भागातील नागरीकांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS