मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी डिजेच्या गाण्यावर धरला ठेका 

Homeताज्या बातम्या

मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड यांनी डिजेच्या गाण्यावर धरला ठेका 

बुलढाणा प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील संगम चौकातून या भव्य मिरवणुकीला सुरुवात हो

धान उत्पादन शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाच स्वागत आहे – राजू शेट्टी
राष्ट्रीयकृत बँकेच्या बरोबरीत गौतम बँक सेवा देणार ः आमदार काळे
नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पाटील लढत रंगणार

बुलढाणा प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील संगम चौकातून या भव्य मिरवणुकीला सुरुवात होवून या मिरवणुकीत अनेक ढोल-ताश्यांच्या व डीजेच्या तालावर नागरिकांनी जल्लोष केला. या मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ही सहभागी झाले होते, ही मिरवणूक जयस्तंभ चौक, बाजार लाईन, आणि एकबाल चौकाजवळील जनता चौक येथे आगमन झाल्यानंतर शिंदे गट शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी रामजी निकली सवारी या डिजेच्या गाण्यावर जोरदार ठेका धरून थिरकरले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांना खांद्यावर घेतले होते. आमदार गायकवाड यांनी हातात भगवा झेंडा घेवून कार्यकर्त्यांसोबत त्यांनी जोरदार ठेका धरला.

COMMENTS