Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील 11 कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’

नवी दिल्ली : राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद

राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपास यंत्रणा सक्षम करणार : ना. शंभूराज देसाई
अल्पवयीन मुलीवर जन्मदात्याकडूनच अत्याचार
ट्रकने दिली दिशादर्शक बोर्ड पोलला धडक.

नवी दिल्ली : राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हे पुरस्कार  प्रदान करण्यात आले. राज्यातील एकूण 11 कलाकारांना याप्रसंगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील मेघदूत सभागृहात 14 ते 17 फेब्रुवारीपर्यंत अमृत युवा कलोत्सव सुरू आहे. यादरम्यान बुधवारी सायंकाळी ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, उपाध्यक्ष जोरावरसिंग जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात वर्ष 2019, 2020 आणि 2021 चे तीन वर्षांसाठीचे एकूण 102 युवा कलाकारांना  पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. वर्ष 2019 साठी लोकसंगीत श्रेणीतील योगदानासाठी राज्यातील विकास कोकाटे, वर्ष 2020 साठी तबला वाद्य बनविणारे किशोर व्हटकर, संगीत वाद्य बनविण्याची श्रेणी नव्याने सुरू करण्यात आली असून व्हटकर या श्रेणीतील पुरस्कार स्वीकारणारे प्रथम कलाकार आहेत. वर्ष 2020 साठी सारंगी वादनासाठी हर्ष नारायण, हिदुस्थानी वाद्य संगीत सितार वादनासाठी शाकीर खान, कर्नाटक वाद्य संगीत (वायलिन) वादनात उल्लेखनिय कार्यासाठी एल. राम कृष्णन, ओडिसा नृत्यातील त्यांच्या योगदानासाठी स्वप्नकल्पा दास गुप्ता, भरतनाट्यम नृत्यातील योगदानासाठी पवित्र कृष्ण भट्ट यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वर्ष 2021 साठी तमाशा या श्रेणीत सुप्रसिद्ध तमाशा कलाकार वैशाली जाधव, पखवाज वादनाच्या योगदानासाठी पंढरपूरातील ज्ञानेश्‍वर देशमुख, नृत्यासाठी संगीत श्रेणीतील त्यांच्या योगदानासाठी मुंबईत जन्मलेले अहसान अली, कथक नृत्यातील समग्र योगदासाठी सुनील सुनकारा यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

COMMENTS