Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बापटांना प्रचारात उतरवल्याने आनंद दवे यांची नाराजी

पुणे/प्रतिनिधी ः कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला जोर चढला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. आपला मतदारसंघ राखण्यासाठ

कोयत्याचा धाक दाखवत लुटली 35 हजारांची रोकड | LOKNews24
बीडमध्ये तीन बालकांचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज | LokNews24
माळेगाव यात्रेतील अफगाणी घोडा ठरला यात्रे करून साठी आकर्षण

पुणे/प्रतिनिधी ः कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला जोर चढला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहे. आपला मतदारसंघ राखण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने गिरीश बापटांना प्रचार रिंगणात उतरवले आहे. काल झालेल्या प्रचारात गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून सहभागी झाले होते. बापटांना बोलतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले होते. बापट यांची ही अवस्था बघून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत जागा अडचणीत आल्याचे कळताच भाजपने गिरीश बापटांना अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत प्रचार करायला लावले. त्यामुळे मी आज वैयक्तिक प्रचार करणार नाही, असे हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे म्हणाले. आनंद दवे हे कसबा पोटनिवडणूक अपक्ष लढवत आहेत. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणूकीत भाजपने टिळक कुटुबीयात उमेदवारी न देता हेमंत रासने यांना रिंगणात उतरवले खरे पण त्यामुळे हिंदू मतदारांच्या नाराजीचा फटका बसू शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन भाजपने गिरीश बापट यांना अंथरुणावर खिळलेल्या अवस्थेत प्रचारासाठी उतरले. नाकात नळी लावून व्हीलचेअरवर बसून त्यांनी केसरीवाडयात मार्गदर्शन केले होते. बापट साहेबांना त्रास होत होता, पण यातना आम्हाला जाणवत होत्या. त्यांना पाहून पर्रिकर आठवले. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास होत असल्यामुळे मी आज व्यक्तिश: प्रचार करणार नसल्याचे ठरवले आहे असे आनंद दवे म्हणाले. कसबा विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवत असल्यामुळे भाजपाला जड जात आहे. त्यामुळेच भाजपला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रचारासाठी आणावे लागत आहे. कसबा मतदारसंघामध्ये खुल्या प्रवर्गातील 60 टक्के समाज आहे. हा सर्व समाज मला पाठिंबा देत आहे, असा दावा आनंद दवे यांनी केला होता. आजवर कसब्यात ब्राह्मणच आमदार निवडून आलेत. बापट यांनी सहा टर्म या भागाचे नेतृत्व केले. नंतर ते खासदार झाले. त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे या वेळी प्रचारात येऊ शकत नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र ब्राह्मणांच्या नाराजीमुळे जागा संकटात येत असल्याचे पाहून देवेंद्र फडणवीसांनी बापटांची घरी जाऊन त्यांना गळ घातली. दुसर्‍या दिवशी बापट प्रचारात दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी गिरीश बापटांच्या प्रचार मुद्दयावरून भाजपला लक्ष्य केले. गिरीश बापटांची मुळातच प्रकृती अस्वस्थ असताना भाजपने त्यांना प्रचारासाठी येण्याची गळ घातली आहे. गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांना भाजपने पक्षांच्या निर्णयापासून लांब ठेवले. भाजपचे मेळावे, कार्यक्रम यामध्ये साधे त्यांचे फोटोही लावले नाहीत. मात्र आज कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली. हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे, असा घणाघाती टीका जगताप यांनी भाजपवर केली. गिरीश बापट यांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय, असे जगताप म्हणाले. कसबा हा कायमच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे.त्यामुळे कसब्यातील जागा अडचणीत आल्याचे संकेत मिळताच भाजपने पाच वेळा कसब्याचे आमदार राहिलेले गिरीश बापट यांना आजारपणात प्रचारासाठी मैदानात उतरवले. भाजपने बापटांना प्रचारात उतरवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही भाजपवर टीका झाली. भाजप आणि महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही पोटनिवडणूकांच मतदान येत्या 27 फेब्रुवारीला होत आहे. त्यातच आता कोणाचा विजय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे.

COMMENTS