कोपरगावात  आजपासून कडक संचारबंदी (कर्फ्यू) लागू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात आजपासून कडक संचारबंदी (कर्फ्यू) लागू

कोपरगाव स्थानिक प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व नागरिक,व्यापारी व आस्थापना यांना कळविण्यात येते कि, कोरोना बाधितांची दैनदिन वाढती रुग्ण संख्या, उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा याची स्थिती पाहता आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.

नगर शहर सहकारी बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका थांबल्या
सहा वाहनांचा भीषण अपघात, 4 ठार, 8 जण जखमी | LOKNews24
तक्रारीची दखल न घेतल्याने महावितरणला आर्थिक दंड

कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगाव स्थानिक प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व नागरिक,व्यापारी व आस्थापना यांना कळविण्यात येते कि, कोरोना बाधितांची दैनदिन वाढती रुग्ण संख्या, उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा याची स्थिती पाहता आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. तसेच अत्यावश्यक सेवा आणि सूट असलेले प्रवर्गातील बाबींकरिता नागरिक मोठ्या प्रमाणात अनावश्यकरित्या घराबाहेर पडत आहेत. 

त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून कडक संचारबंदी (कर्फ्यू) लागू करणे बाबत मा.जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांचे आदेश क्र.डी.सी./कार्या ९ब१/ ९५१/२०२१ दिनांक १७/०४/२०२१ नुसार  दिनांक १८ एप्रिल २०२१ रात्री १२.०० वा पासून ते दिनांक ०१ मे २०२१ रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत फौजदारी प्रकिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संलग्न खालीलप्रमाणे मनाई, नियंत्रण व विनियमन करणेत येत आहे. तरी सदर कालावधीत अत्यावश्यक सेवा सकाळी ७.०० वाजेपासून ते सकाळी ११.०० वाजेपर्यंतच सुरु राहतील. व इतर सर्व आस्थापना बंद राहतील.  तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. 

(१) किराणा दुकान.

(२) दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री.

(३) भाजीपाला विक्री (फक्त घरपोच सेवा)

(४) फळे विक्री व पाणी जार (फक्त घरपोच सेवा)

(५) अंडी, मटन, चिकन, मत्स विक्री.

(६) कृषी संबंधित सर्व सेवा/ दुकाने.

(७) पशुखाद्य विक्री.

(८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल / डीझेल/ एलपीजी गॅस विक्री. 

(९) पेट्रोल पंपावर सर्वजनिक वाहतूक,अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डीझेल विक्री नियमित वेळेनुसार.

वरील सर्व अत्यावश्यक सेवा ह्या सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंत वेळेच्या निर्बंधासह चालू असतील. 

तरी कोपरगाव शहरातील सर्व भाजीपाला ,फळे विक्रेते व पाणी जार सेवा पुरविणारे यांना विनंती की, उद्या दिनांक १९ एप्रिल २०२१ ते दिनांक ०१ मे २०२१ रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत कोणीही दुकाने लावू नये. सकाळी ७.०० ते ११.०० वाजेपर्यंतच घरपोच सेवाद्वारे विक्री करावी.  इतर सर्व आस्थापना पूर्वीच्या आदेशा प्रमाणेच १००% बंद राहतील याची सर्व व्यापारी व नागरिकांनी नोंद घ्यावी. ज्या आस्थापना नियमांचे पालन करणार नाही त्या कोविड -१९ संपेपर्यंत बंद/ सील करण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी याशिवाय अत्यावश्यक कामानिमित्त विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस रू. ५०० दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या व्यक्तीस रू. १००० दंड आकाराण्यात येईल. तरी वरील नियमांचे काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन कोपरगाव प्रशासनाच्या वतीने शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.

COMMENTS