Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्टेट बँक ऑफ इंडियाला 47 कोटी 65 लाखांचा गंडा

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाहन कर्ज सल्लागारानेच बँकेची 47 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार

शासकीय कर्मचारी तिसऱ्या दिवशी रस्त्यावर
महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करावी, आ. सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
सांगली भाजप जिल्हाध्यक्ष पदाची माळ निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार?

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाहन कर्ज सल्लागारानेच बँकेची 47 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुणे विद्यापीठ रस्ता आणि टिळक रस्ता शाखेत हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आदित्य नंदकुमार सेठिया याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बँकेकडून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. 2017 ते 2019 या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. बँकेच्या लेखापरीक्षणातून याबाबतची माहिती पुढे आली. बँकेच्या कर्मचार्‍याने केलेल्या या फसवणूकीमुळे कुंपणानेच शेत खावे, असा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत घडला आहे. बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेली 46 वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते. वाहन कर्ज मंजूर करून देणारे आणि बँकेचे वाहन कर्ज सल्लागार आरोपी आदित्य सेठिया आणि इतर साथीदारांनी बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून कर्ज मंजूर केली. आरोपींनी बँकेतून महागड्या गाड्यांसाठी मोठ्या रकमेचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले. काही प्रकरणात सुरुवातीला इतर खात्यांवर रक्कम वळवण्यात आली. त्यानंतर संबंधित वाहन कर्जदाराच्या नावावर ही रक्कम वर्ग करत बँकेची 47 कोटी 65 लाख 26 हजार रुपयांनी फसवणूक केली. आरोपींनी अशा पद्धतीने आणखी काही बँकांची फसवणूक केल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

COMMENTS