कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या अधिक लक्ष देऊन लढू तसेच पहिल्यापेक्षा अधिक मतानी नि
कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितरित्या अधिक लक्ष देऊन लढू तसेच पहिल्यापेक्षा अधिक मतानी निवडून येऊ अशी आशा अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे भाजप पक्षवाढीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आले होते. क्षेत्र कोणतेही असो त्यात जाती धर्म नाही तर कार्य महत्त्वाच.
आतंकवाद थांबवायचा असेल तर मुस्लिम तरुणांना सैन्यात भरती करा. अशी मागणी गुलाब रसूल यांनी केंद्राकडे केली आहे. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशांमध्ये खेळाची टीम असो किंवा सैन्याची टीम असो कोणत्याही जाती धर्मावरून निवड केली जात नाही तर त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कर्यावरून निवड केली जाते असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपाच्या ठाकूर यांनी संजय राऊत यांचा घेतला खरपूस समाचार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेला शपथ विधिवर संजय राऊत यांनी दहा अजूबे दुनियेत असून दोन दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांवर केली होती, यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा संजय राऊत यांनी केलेल्या घोटाळ्यावर चर्चा केली तर अधिक बरे होईल असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.
COMMENTS