Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये नुकतीच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागरूक पालक सदृढ बालक अभियान अंतर्गत सर्

महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे
विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …
*SPECIAL REPORT: मा. आ. चरण वाघमारे यांचा सरकारला ‘१७० कोटींचा’ सल्ला | LokNews24*

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये नुकतीच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागरूक पालक सदृढ बालक अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. या अभियानाअंतर्गत सर्व शासकीय शासकीय शाळा, खाजगी शाळा येथिल शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या मुला मुलींची तपासणी होणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भसेवा देण्यात येणार आहेत अशी माहीती ग्रामीण रुग्णालय अधीक्षक सचिन यादव यांनी या प्रसंगी दिली.
या आरोग्य तपासणी अभियाना करीता कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉ.जितेंद्र रणदिवे, डॉ.काजल गलांडे, डॉ.दिपाली आचार्य, डॉ.मनिषा बेंद्रे व डॉ.सपना भंडारी यां वैद्यकीय अधिकार्‍याचा समावेश होता. सलग दोन दिवस ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकामार्फत विदयार्थीची आरोग्य तपासणी करण्यात आली या प्रसंगी डॉ यादव यांनी पुढे बोलताना सांगितले की, या तपासणीतून आवश्यकतेनुसार बालकांना आरोग्य केंद्रात मंगळवार आणि शुक्रवारी तसेच ग्रामिण रुग्णालयात शनिवारी तपासणी करीता पाठवण्यात येणार आहे. या सर्व तपासणीत पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास बालकांना जिल्हा रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यामध्ये पाठविण्यात येणार आहे. हे आरोग्य तपासणी अभियान पुढील दोन महिन्यांमध्ये राबविण्याचे आरोग्य तपासणीचे नियोजन आहे. अशी माहीती वैदयकीय अधिकारी डॉ.जितेंद्र रणदीवे यांनी दिली. या वैद्यकीय तपासणी शिबीरप्रसंगी वैदयकीय पथकांचे स्वागत एस जी शाळेचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले.

COMMENTS