Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृह, वाहनकर्ज पुन्हा महागणार

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ

मुंबई/प्रतिनिधी ः महागाईचा दर सातत्याने वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी व

बांगलादेशात रोहिंग्यांच्या दोन गटातील चकमकीत सहा जण ठार
श्रीरामपूर शहरात आता बुधवारी व शनिवारी पाणीपुरवठा राहणार खंडित
शेतकऱ्यांना अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज

मुंबई/प्रतिनिधी ः महागाईचा दर सातत्याने वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे गृह, वाहनकर्ज पुन्हा महागणार आहे. मॉनटिरी पॉलिसी समितीच्या बैठकीत 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो रेट वाढवण्याच्या निर्णयाच्या बाजुने मतदान केले. या नव्या वाढीसह आता रेपो रेट 6.50 टक्के इतका झाला आहे. मे 2022 पासून आतापर्यंत एकूण सहावेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. ही वाढ 2.25 टक्के इतकी आहे.
रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठीच्या (2022-23) शेवटच्या पतधोरण बैठकीत रेपो रेट 0.25 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आधावा बैठकीत 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले. रेपो दर 0.25 टक्क्यांच्या वाढीनंतर तो आता 6.50 टक्के इतका झाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर ही घोषणा केली. रेपो दर गेल्या वर्षी मे 2022 पासून तब्बल 6 वेळा 2.25 टक्क्यांनी वाढला आहे. यासंदर्भात आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पाद (जीडीपी) 7.8 टक्क्यांनी वाढणे शक्य आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये वास्तविक जीडीपी वाढ 6.4 टक्के अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये महागाई 6.7 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवर येण्याची अपेक्षा आहे. तर आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत महागाई दर 5.9 टक्क्यांवरून 5.6 टक्क्यांवर येण्याची अपेक्षा आहे. रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे हप्ते महाग होतात. यामुळे जर फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल तर त्याचा हप्ता वाढेल. दुसरीकडे रेपो रेट वाढल्यानंतर बँका एफडीसह ठेवींवर अधिक व्याज देऊ शकतात.

कर्ज घेणार्‍या ग्राहकांवर व्याजदराचा बोजा – रेपो दर वाढल्यामुळे अनेकांनी कर्जे महागणार आहे. मात्र रेपो दर आणि व्याजदराचा संबंध काय तर, अनेकदा बँका भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतात. जेव्हा रिझर्व्ह बँक इतर बँकांना दिलेल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करते तेव्हा रेपो रेट वाढला असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले की, कर्जाऊ भांडवल घेणार्‍या बँकाही तोटा होऊ नये म्हणून आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जाच्या व्याज दरात वाढ करतात. व्याजदरवाढीचा बोजा स्वत: सहन न करता तो भार ग्राहकांवर टाकणे हे बँकांसाठी नित्याचे आहे. बँकांच्या नफ्याचे प्रमाण किती आहे. यावर व्याजदर वाढीचा बोजा आपण सोसायचा का? किती सोसायचा? हे कर्जदात्या बँका व वित्तसंस्था ठरवतात. त्यामुळे अनेकांची कर्जे आता महाग होणार आहे.

COMMENTS