Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरातील वाद घरातच मिटवू – पटोले

बाळासाहेब थोरातांनी केली पत्राद्वारे पक्षश्रेष्ठीकडे तक्रार

मुंबई/प्रतिनिधी ः काँगे्रसमधील संघर्ष काही संपण्याची चिन्हे नसून, काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या आजारपणात झालेले राजकारण कि

गो मांसची वाहतूक करणारी गाडी शिरवळ येथे पकडली; शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
साखर कारखान्यावर मिश्किल भाषेत वक्तव्य :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी | LokNews24
पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः काँगे्रसमधील संघर्ष काही संपण्याची चिन्हे नसून, काँगे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या आजारपणात झालेले राजकारण किळसवाणे ऊन, आपण त्यासंदर्भात पक्षक्षेष्ठीकडे पत्र लिहून तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच नाना पटोलेंसोबत काम करणे अशक्य असल्याचे वक्तव्य देखील थोरात यांनी केल्याचे समजते. यावर बोलतांना काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, काँगे्रस एक कुटुंब असून, घरातील वाद घरातच मिटवू असे वक्तव्य केले आहे.  

पुण्यात बोलतांना नाना पटोले म्हणाले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. घरातले भांडण घरात सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. वरिष्ठ नेत्यांबरोबर काय बोलणे झाले हे जाहीर सांगायचे नसते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार विजयी होतील. माजी खासदार रजनी सातवांच्या वेळेस मी देवेंद्र फडणवीस यांना बिनविरोध निवडणूक करण्यासाठी भेटायला गेलो होतो. परंतु त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. भाजप फक्त विविध प्रसारमाध्यमातून चर्चा करत आहे. प्रत्यक्ष कोणीही आमच्याशी दोन जागा बिनविरोध करण्याबाबत चर्चा केली नाही. त्यामुळे या जागा बिनविरोध होणे कठीण असल्याची त्यांनी चर्चा केली आहे.

दरम्यान, यावर बोलतांना काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले, नाना पटोलेंविरोधात बाळासाहेब थोरातांनी वरिष्ठांकडे पत्र दिले असले तरी आम्ही सर्वजण नाना पटोलेंसोबत आहोत. महाविकास आघाडी एकत्रित असून नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आमचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कसबा आणि चिंचवड येथील जागा बिनविरोध करण्याची भाषा भाजप करते आहे. मात्र, देगलूर, कोल्हापूर मध्ये अशाप्रकारे परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी कोणती भूमिका घेतली हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे सोयीनुसार भाजप वागत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.

तर माघार घेईल – रवींद्र धंगेकर – तर, कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, कसबा विधानसभा मतदारसंघात मला तिकीट जाहीर झाल्याबद्दल मी महाविकास आघाडीतील नेत्यांचे आभार मानतो. इतके वर्ष तिन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गाने निवडणूक लढत असल्याने त्याचा फायदा भाजपला होत होता. मात्र, यंदा प्रथमच तिन्ही पक्ष एकत्रित आल्याने महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल. माझ्या नेत्यांनी मला या निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितल्यास मी निवडणूक बिनविरोध करण्यास तयार आहे.

COMMENTS