Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन वर्षानंतर मार्डी मार्गे खुंटबावला एसटी बस सुरू; महिला अधिकार परिषदेच्या मागणीला यश

गोंदवले / वार्ताहर : कोरोना लॉकडाऊनपासून मार्डी मार्गे खुंटबावला येणारी एसटी बंद झाली होती. त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. यासाठी महिला अधिक

शासनाच्या योजना राबवून समाज सुखी झाला का? : भास्करराव पेरे-पाटील यांचा सवाल
गुरुजींच्या डमीला हद्दपार करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये गुरूजींचे फोटो
एसटीच्या संपप्रश्‍नी खा. शरद पवार यांची मध्यस्थी?

गोंदवले / वार्ताहर : कोरोना लॉकडाऊनपासून मार्डी मार्गे खुंटबावला येणारी एसटी बंद झाली होती. त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती. यासाठी महिला अधिकार परिषदेच्या माध्यमातून खुंटबाव येथील महिलांनी 6 जानेवारी रोजी तहसीलदार माण व दहिवडी आगार प्रमुखांना एसटी सुरू करण्याबाबत निवेदनाद्वारे विनंती केली होती.
निवेदनात म्हटले होते की, मार्डी हे मुख्य बाजारपेठेचे गाव असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका, खाजगी दवाखाने आहेत. परंतू मागील तीन वर्षांपासून एसटी बंद असल्याने बचत गटातील महिला, एकल निराधार महिला, आजारी लोक, वृध्दांची गैरसोय होत आहे. महिला अधिकार परिषदेच्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हा आगार प्रमुखांनी एसटी सुरू करण्यास मान्यता दिली. या कामी दहिवडीचे आगार प्रमुख पाटील यांनी प्रयत्न केले.
एसटी बस सुरू झाल्यामुळे खुंटबाव येथील महिला व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिलांनी एसटीच्या बसचे हार घालून पूजन करून चालक-वाहकांचे पुष्प, नारळ देऊन स्वागत केले. तसेच आगार प्रमुख, नियंत्रक यांना धन्यवाद दिले.
यावेळी महिला अधिकार परिषदेच्या अध्यक्ष भारती पवार, रेश्मा शिलवंत, अस्मिता तुपे, तौशिफा मुलाणी, रेश्मा साळुंखे, अलका ननावरे, बाळूताई शिंदे, हवाजान मुलाणी, रुक्मिणी शिरतोडे, सुमन माने, योगिता पाटोळे, भामा ननावरे, पॅरन मुलाणी, अनिता शिंदे, राणी अहिवळे, मालन चोपडे, विद्या शिरतोडे आदी महिला उपस्थित होत्या.

COMMENTS