Homeताज्या बातम्याविदेश

तुर्की भूकंपाने घेतले अनेक जीव

तुर्की प्रतिनिधी - भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी तुर्कस्तान हादरलंय. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तुर्

शर्मिला गोसावी यांना रमाई गौरव पुरस्कार जाहीर
लातुरात आता पशुरोग निदान प्रयोगशाळा
चक्क पोलिस स्टेशनमध्येच भरवला जुगाराचा अड्डा

तुर्की प्रतिनिधी – भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी तुर्कस्तान हादरलंय. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तुर्कस्तानमध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. तुर्कीमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. भूकंपात अनेकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुर्कीमध्ये भूकंपानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखालून अनेकांना बाहेर काढलं जात आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. मलब्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होतेय. दक्षिण तुर्कीत सोमवारी पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सायप्रस, लेबनॉन आणि सीरियामध्येही हे धक्के जाणवले. भूकंपानंतर दक्षिण तुर्कीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.

COMMENTS