Homeताज्या बातम्यादेश

आसाराम बापू बलात्कार प्रकरणात दोषी

न्यायालय आज सुनावणार शिक्षा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः बलात्कार प्रकरणात सध्या जोधपूर कारागृहात असलेले आसाराम बापू यांच्या अडचणीत वाढ झाली असून, सत्र न्यायालयाने त्यांना 2013 च्

पाटण तालुक्यात वीज पडल्याने 2 म्हैशीचा मृत्यू
शेवगावच्या प्रश्‍नांसाठी विधानसभेत हक्काच्या माणसाची गरज ः  नरेंद्र घुले पाटील
शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः बलात्कार प्रकरणात सध्या जोधपूर कारागृहात असलेले आसाराम बापू यांच्या अडचणीत वाढ झाली असून, सत्र न्यायालयाने त्यांना 2013 च्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले असून, याप्रकरणी न्यायालय आज मंगळवारी शिक्षा सुनावणार आहे. त्यासोबत न्यायालयाने अन्य आरोपींना निर्दोष ठरवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आसाराम बापूवर 2013 मध्ये सुरतच्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तर नारायण साईवर याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी आहेत. तसे, यावेळी आसारामला न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी ठरवले पण शिक्षेची घोषणा केली नाही. शिक्षेबाबत उद्या निर्णय दिला जाईल, असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे आसाराम याआधीच दुसर्‍या एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या तो जोधपूर कारागृहात बंद आहे. याआधीही जेव्हा-जेव्हा आसाराम यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सुप्रीम कोर्टात आसारामच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती. म्हातारपण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळायला हवा, असे त्यावेळी आसाराम म्हणाले होते. मात्र न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नव्हते.

COMMENTS