Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवठाण येथील शिबिरातून 46 बॅगचे रक्तसंकलन

अकोले प्रतिनिधी ः ग्रामपंचायत देवठाण  व जनसेवा ग्रामविकास मंडळ, देवठाण तसेच, आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमि

धारणगावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांचा सन्मान
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने अनुदान द्या
अबॅकस स्पर्धेत कु. ज्ञानेश्‍वरी चन्ने जिल्ह्यात चॅम्पियन

अकोले प्रतिनिधी ः ग्रामपंचायत देवठाण  व जनसेवा ग्रामविकास मंडळ, देवठाण तसेच, आधार रक्तपेढी संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यविरांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीला ग्रामपंचायतीचे प्रजासत्ताक दिनानिमित्त वन परिमंडल अधिकारी पंकज देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
       या भव्य रक्तदान शिबिरात 46 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावुन स्वातंत्र्याविरांना अभिवादन केले.विशेष म्हणजे यात महिलांचा सहभाग उत्स्फूर्तपणे दिसून आला. रक्तदान हे श्रेष्ठ दान, रक्तदान म्हणजे जीवन दान.. तर चला करूया  रक्तदान आणि वाचूया कोणाचे तरी प्राण..! या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद हा आयोजकांचा उत्साह वाढविणारा होता. माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांच्या संकलोनेतून हे रक्तदान शिबिर हे दि.26 जानेवारी रोजी  सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय देवठाण येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी विशेष अतिथी म्हणून ह.भ.प.मदन महाराज वरपे, भाजपा तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,अरुणराव शेळके,सरपंच निवृत्ती जोरवर, सुभाष काकड, सोमनाथ शेळके, एकनाथ सहाणे,अनील सहाणे, सुधीर शेळके, रमेश बोडके, उपसरपंच आनंदा गिर्हे, किसन रेवजी शेटे, रामदास काळे,श्रीकांत सहाणे, राजेंद्र महाराज कराड, अशोक महाराज कराड ,यशवंत पथवे, श्रीरंग शेळके, संदीप कदम,विकास बोडके,निलेश शेळके,संदीप कराड,किरण शेळके, माधव कातोरे, किसन काकड,सुभाष सहाणे,शामराव पथवे,चंद्रभान सोनवणे, अनिल सहाणे,बबलू पथवे,बाळू गायकवाड, संजय काकड,शांताराम उदमले, सुनील काकड, कैलास दराडे, खंडू गायकवाड, भारत सहाणे, सादीक इनामदार, दत्तात्रय शेळके, प्रवीण सहाणे, चंद्रभान सोनवणे, सावळे राम कातोरे, संजय पथवे, सोनू येलमामे, सागर काळे, राहुल घावटे, शोभा निरगुडे, भारती शेळके, काजल घावटे, पुष्पा सहाणे, राजश्री शेळके, अनेक मान्यवर उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर गेल्या 2000 सालापासून सातत्याने घेतले जाते.यासाठी ग्रामस्थ आणि युवकांचे मोठे योगदान आहे.

COMMENTS