Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लासुर मुक्कामची बस पलटी झाल्याने ड्रायव्हर सह प्रवासी जखमी

जळगाव प्रतिनिधी- चोपडा डेपोची बस लासुर येथे मुक्कामाला असल्याने सकाळी प्रवासी घेऊन चोपडा येथे येत असताना हिंगोना ते अक्कुलखेडा च्या मध्ये रस्त

‘या’ महामार्गावर भीषण अपघात; 14 जण जखमी
थांबलेल्या लालपरीवर भरधाव कार धडकली, कारचा चेंदामेंदा
विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी- चोपडा डेपोची बस लासुर येथे मुक्कामाला असल्याने सकाळी प्रवासी घेऊन चोपडा येथे येत असताना हिंगोना ते अक्कुलखेडा च्या मध्ये रस्त्यावर पिकअप गाडी समोर अचानक आल्याने बस साईटला घेतल्यानंतर साईट पट्ट्या नसल्याने खोल चारी असल्याने त्या चारीत बस पलटी झाली या बस मध्ये लासूर आणि हिंगोना येथील 14 ते 15 प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी काही प्रवासींना मुक्का मार लागला असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सदर हिंगोणा ते अक्कुल खेडा रस्ता रुंद आणि साईट पट्ट्या नसल्याने हा अपघात घडला आहे. सदर रस्त्यांवर साईट पट्ट्या व रस्त्याचे दुरुस्ती करण्याची मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. सदर अपघातातील जखमी बस चालकासह प्रवासी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. सदर जखमींची विचारपूस करण्यासाठी चोपडा बस स्थानकाचे व्यवस्थापक संदेश शिरसागर सह त्यांचे कर्मचारी व चोपडा सूतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ हे उपजिल्हा रुग्णालयात जखमीचे विचारपूस करत होते. 

COMMENTS