Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 चांदवडला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ ; चावा घेतल्याने सहा जण जखमी

  नाशिक प्रतिनिधी - येथील बसस्थानक, महालक्ष्मीनगर, तळवाडे रोड, गणूर चौफुली परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने नागरीकांना चावा घेतल्याने सहा जण जखमी

पुण्यात बिबट्याने केली पाळीव कुत्र्याची शिकार
केरळमधील कोझिकोड मध्ये निपाह व्हायरसमुळे २ जणांचा मृत्यू
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

  नाशिक प्रतिनिधी – येथील बसस्थानक, महालक्ष्मीनगर, तळवाडे रोड, गणूर चौफुली परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने नागरीकांना चावा घेतल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.चांदवड येथील बसस्थानक परिसरासह गणूर चौफुली, तळवाडे रोड, महालक्ष्मीनगर, बाजार समिती परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नागरीकांना चावा घेत सुटल्याने चांगलाच धुमाकूळ घातला. यात  शांताराम विठोबा घुले (42, चांदवड), योगेश बाळू पवार (29, हरसूल), काव्या कन्नन (18, नाशिक), सानिया सुंदर कोकाटे (13, चांदवड), कृष्णा लक्ष्मण जाधव (12, चांदवड), संपत गणपत आवारे (75, परसूल) यांना हाता-पायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले. जखमींनी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत उपचार घेतले. या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.  या संदर्भात योगेश पवार राहणार हरसुल व कृष्णा जाधव वय बारा राहणार चांदवड यांनी अधिक माहिती दिली

COMMENTS