Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नदी जिवंत उपक्रम राज्यात राबवून पुढील पिढ्याना जीवनदान द्यावे ;- प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे

पाथर्डी प्रतिनिधी - बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर मढी येथे संपन्न झाले. शेवटच्या दिवशी एनएसएस स्वयंसेव

पारनेर शिवसेनेशी जवळीक ; खा. डॉ. विखेंना भोवणार? ; भाजप प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार दाखल
आदिवासी महिलांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचा डाव – पिचड
शिरसाटवाडी दगडफेक प्रकरण घडवून आणलेला सहानुभूती स्टंट : प्रताप ढाकणे

पाथर्डी प्रतिनिधी – बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर मढी येथे संपन्न झाले. शेवटच्या दिवशी एनएसएस स्वयंसेवकांनी तालुक्यातील मढी येथील दत्तकग्राम मढी पवना नदी स्वच्छ करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी नदीघाटची स्वच्छता करून वाढलेले अनावश्यक गवत, देवी देवतांच्या फाटक्या मूर्ती, मृत व्यक्तींचे कपडे, निर्माल्य, झाडे झुडपे, प्लास्टीक कचरा, दशक्रिया विधीचे मुंडण केलेले केस, पाणी बॉटल, गाजर गवत,आदी निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावली. तालुक्यातील नद्या जिवंत करण्याचे अभियान महाविद्यालयाच्या पुढाकाराने व स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनातून सुरु करण्यात आले. 

वृक्षतोड थांबविण्याबरोबरच,रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी किनारी दशक्रिया विधीचे साहित्य, अन्नपदार्थ टाकण्याऐवजी याची जाळून अथवा पुरून विल्हेवाट लावने, नदी किनारी कचराकुंडी ठेवणे आदी उपक्रमांची सुरुवात मढी येथून करण्यात आली. यावेळी नदी जिवंत करण्याचा मढी पॅटर्न बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाने राज्यभर सर्व महाविद्यालायांमध्ये अशी अंमलबजावणी विद्यार्थ्यांमार्फत करून पुढील पिढ्याना जीवनदान द्यावे अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांनी व्यक्त केली.नदी जिवंत उपक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी’ हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो.आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो.म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करत असतो.महात्मा गांधींचा ‘खेड्याकडे चला’ हा विचार घेऊन गावांमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरांमार्फत निर्मलग्राम,सर्वांगीण व शाश्वत ग्रामविकास,चर खोदणे, रस्ते बांधणी, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, आदी कार्यश्रमदान, पथनाट्य, रॅली, उद्बोधक चर्चा, शिवारफेरी, गावकरी संवाद या माध्यमांतून समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात युवाशक्ती वा ऊर्जास्त्रोत पुरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे.प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे असे ते शेवटी म्हणाले. 

यावेळी मढी गावचे सरपंच संजय मरकड, माजी सरपंच देविदास मरकड, कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब मरकड, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ अरुण राख, आनंद घोंगडे, डॉ सुभाष शेकडे, डॉ बबन चौरे, डॉ अशोक डोळस, डॉ किरण गुलदगड, डॉ अजयकुमार पालवे, डॉ अभिमन्यू ढोरमारे, प्रा. दत्तप्रसाद पालवे, प्रा. ब्रम्हानंद दराडे, प्रा. सचिन पालवे आदी उपस्थित होते.

COMMENTS