Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात कारखान्यास ऊस विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

संगमनेर/प्रतिनिधी ः काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी मापदंड ठरलेल्या स

मजुरीचे पैसे मागितल्याने दाम्पत्यास बेदम मारहाण
करंजीत अखंड हरीनाम सप्ताहाची जल्लोषात सांगता
खासगी हॉस्पिटल्स बदनामीच्या गर्तेत ; आक्षेपांकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष?

संगमनेर/प्रतिनिधी ः काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी मापदंड ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकास बद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पुणे मांजरी येथे झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ,उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला. नॅशनल फेडरेशन ऑफ को ओपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे होते. आ.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा आदर्शवत पॅटर्न म्हणून राज्यात व देशात दिशादर्शक ठरत आहे. या सहकार मॉडेलचा पुन्हा एकदा राज्यपातळीवर गौरव झाला आहे. मागील अनेक वर्षे ऑडिटचा अ दर्जा राखून सातत्याने सामाजिक उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे. उपक्रमशिलता कायम ठेवून जलसंधारण व तालुक्याचे हदय म्हणून काम करतांना कमी पाऊस असून ही या कारखान्याने सातत्याने सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्‍वास संपादन केला असून मागील हंगामात 15 लाख 51 हजार मे. टन टनाचे उच्चांकी गाळप करून विक्रमी भाव दिला आहे. तसेच सतत ऊस विकाससासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आर्थिक शिस्त, नियोजन व दुरदृष्टी ठेवून गुणवत्तापुर्वक राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या कारखान्याला आत्तापर्यंत राज्य व देशपातळीवर अनेकवेळा गौरविण्यात आले आहे. सहकाराची पंढरी ठरलेल्या संगमनेरच्या शिरपेचात कारखान्याला मिळालेल्या या पुरस्काराने मानाचा तुरा रोवला आहे. या पुरस्कार स्वीकारणेवेळी कारखान्याचे संचालक मिनानाथ वर्पे, भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, माणिकराव यादव, दादासाहेब कुटे,संभाजी वाकचौरे, भास्कर आरोटे, मंदाताई वाघ, मिराताई वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, शेतकी अधिकारी बी.बी.खर्डे, ऊसविकास अधिकारी बी. पी. सोनवणे आदि उपस्थित होते.

COMMENTS