Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्यात शंकर व वात्सल्य मूर्तीची प्रतिष्ठापना

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील शनी मंदिरात आज पौष आमावस्येनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वाराशेजारी शंकर व वात्सल्य मुर्तीची प्रतिष्ठापना ह.भ.

याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा
परमबीर सिंह यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप ; चौकशीला सुरुवात | सुपरफास्ट महाराष्ट्र | Lok News24
गौतमी पाटीलची ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी

श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील शनी मंदिरात आज पौष आमावस्येनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वाराशेजारी शंकर व वात्सल्य मुर्तीची प्रतिष्ठापना ह.भ.प.भुषण महाराज महापुरूष यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते, भगवंत वाळके यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पुर्व बाजुस वात्सल्य मुर्ती माजी आमदार राहुल जगताप यांच्या वतीने अर्पण करण्यात आली तर पश्‍चिमेस श्री शंकराची मुर्ती दादासाहेब बबन कोथिंबिरे यांनी अर्पण केली. मंदिरावरील एलईडी लाईट बोर्ड कैलास गंगाधर काळे यांच्या वतीने अर्पण करण्यात आले. शनिवारी पौष आमावस्येनिमित्त हजारो भाविकांनी शनीचे दर्शन घेतले, दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. होती. शनिमारुती देवालय ट्रस्ट चे अध्यक्ष राणा खेतमाळीस यांनी या देवस्थानच्या अध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतल्या नंतर त्यांचे वडील स्व. सोपानराव खेतमाळीस यांच्या प्रमाणेच या देवस्थान च्या विकासासाठी देवस्थानचे विश्‍वस्त कैलास गंगाधर काळे यांना सोबत घेत सर्व विश्‍वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

COMMENTS