Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये शुक्र तीर्थ ऑडिओ बुकचे अनावरण  

कोपरगाव प्रतिनिधी ः जगातील एकमेव अशा गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर व शुक्राचार्य महाराज यांची माहिती व महती सांगणारे देवस्थान अध्यक्ष  बाळासाहेब

वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन
माहिती अधिकाराच्या 13 हजार याचिका प्रलंबित
सहकर पॅनलचे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव प्रतिनिधी ः जगातील एकमेव अशा गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर व शुक्राचार्य महाराज यांची माहिती व महती सांगणारे देवस्थान अध्यक्ष  बाळासाहेब आव्हाड लिखित शुक्रतीर्थ या ऑडियो पुस्तकाचे लॉन्चिंग कोपरगांव शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले.  

सदर पुस्तक उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागचंद रुईकर यांनी केले तर ट्रस्ट चे अध्यक्ष व पुस्तकाचे लेखक बाळासाहेब आव्हाड यांनी पुस्तकाविषयी माहिती देतांना सांगितले की, शुक्रतीर्थ हे पुस्तक अत्यंत लोकप्रिय असलेले आणि एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी सबक्राईब केलेले प्रसिद्ध अशा स्टोरीटेल या  अ‍ॅपवर आता ऑडियोमध्ये उपलब्ध झाले आहे. त्यास प्रसिद्ध कलाकार सचिन सुरेश यांनी आपला सुंदर आणि भारदस्त आवाज दिलेला आसल्याची माहिती आव्हाड यांनी देत सर्वांनी डीेीूींंशश्र हे अ‍ॅप डाऊनलोड करून गुरू शुक्राचार्य महाराजांवर आधारित शुक्र तीर्थ या पुस्तकाचा ऑडियो बुक स्वरूपात अवलोकन करावे असे आवाहन आव्हाड यांनी केले. या प्रसंगी शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी बोलताना सांगितले की, परमसद्गुरू शुक्राचार्य महाराजाचे जगातील एकमेव असे हे मंदिर असून या मंदिरात कुठलेही शुभकार्य करण्यास कोणत्याही प्रकारचा मुहूर्त लागत असे एकमेव मंदिराची महती देणार्‍या या ऑडिओ पुस्तकामुळे नक्कीच या मंदिराची महती करोडो भविकापर्यंत जाणार त्यामुळे नक्कीच या मंदिराचा अजून प्रचार प्रसार होणार आहे. या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड , संजय वडांगळे, दत्तात्रय सावंत, मधुकर साखरे, अ‍ॅड नितीन भवर, दिलीप सांगळे, भागचंद रुईकर, मुन्ना आव्हाड, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब जंगले, ओंकार आव्हाड, सर्व मंदिर कर्मचारी आदी उपस्थित होते. सदर प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार राजेन्द्र (मुन्ना) आव्हाड यांनी मानले.

COMMENTS