अहमदनगरच्या नामांतरा विषयी धनगर समाज बांधव आक्रमक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 अहमदनगरच्या नामांतरा विषयी धनगर समाज बांधव आक्रमक

बीड प्रतिनिधी -  अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा या मागणीसाठी धनगर समाज यशवंत सेना आक्रमक झाली आहे. बीड - अहमदनगर महामार्गावरील शासकीय दिशादर्शकावरी

दिव्यांग बांधवांच्या वेदना कमी झाल्याचे समाधान
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र
वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार.

बीड प्रतिनिधी –  अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा या मागणीसाठी धनगर समाज यशवंत सेना आक्रमक झाली आहे. बीड – अहमदनगर महामार्गावरील शासकीय दिशादर्शकावरील अहमदनगरचे नामांतर अहिल्या नगर करण्यात आलंय. बीड मधील उखंडा फाटा इथे हे आंदोलन केलं जातंय. दरम्यान यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील या पिता-पुत्रांनी अहमदनगरच्या नामांतराला विरोध दर्शविल्याने त्यांचा देखील निषेध करण्यात आला. बीड – अहमदनगर राज्य महामार्गावरच हे तीव्र आंदोलन होत आहे. यावेळी शेकडो धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत. लवकरात लवकर या नामांतराचा विषय मार्गे लावा अन्यथा धनगर समाज बांधव राज्यभरात तीव्र आंदोलन करू असा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे.

COMMENTS