Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेसाठी लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पासाठी लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासना

माण तालुक्यातील मागील पाणी टंचाईतील टँकरची बिले थकली
संस्कारी मुला विषयी आई वडील धन्य होतात। 
महागाईसह इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह बैलगाडी चालवून निषेध

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पासाठी लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे नगरसेवकांच्या सूचनांशिवाय तयार करण्यात येणारा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा चालू आर्थिक वर्षीचा अर्थसंकल्प 40 हजार कोटी रुपयांचा होता. एका राज्याच्या अर्थसंकल्पाइतके या अर्थसंकल्पाचे आकारमान असते. मार्च 2022 मध्ये महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत हा अर्थसंकल्प सादर होत असल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून, लोकप्रतिनिधी नसल्याने 2023 – 24 चा अर्थसंकल्प हा केवळ प्रशासनस्तरावर सादर केला जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प तयार करताना माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, एनजीओ आणि विविध विभागातील संघटनांच्या विभागवार सूचना, अभिप्रायाचाही विचार करण्यात यावा. तसेच सदर अर्थसंकल्प मुंबईतील सामान्य नागरिकांना अवगत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर एक नवीन पोर्टल तयार करून त्यामध्ये 2023 2024 या अर्थसंकल्पाची माहिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाने केली होती. याबाबत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रही पाठवले होते. ही मागणी मान्य करीत प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या आहेत.

COMMENTS