औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ  एका उमेदवाराची निवडणुकीत माघार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ  एका उमेदवाराची निवडणुकीत माघार

14 उमेदवार रिंगणात

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून

तक्रारदार गायब, पण खटला सुरू !;परमबीर सिंहांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बोचरी टीका
 मोकाट कुत्र्यांविरोधात एमआयएमचे मनपा समोर मिठाई वाटत आंदोलन 
गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली. डॉ.गणेश वीरभद्र शेटकर अपक्ष या एका उमेदवाराने शिक्षक मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे. काळे विक्रम वसंतराव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव – भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव – वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील – अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) – अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख – अपक्ष, कादरी शाहेद अब्दुल गफुर – अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी – अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके – अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील – अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर – अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव – अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे – अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे – अपक्ष असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

COMMENTS