Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर !

 मुंबई प्रतिनिधी - मुंबई येथील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप लाईगर मोबिलिटीने (Liger Mobility) भारताची पहिली सेल्फ बॅलेन्सिग इलेक्ट्रिक स्कूटर

कृष्णा अभिमत विद्यापीठाचा आज 10 वा दीक्षांत सोहळा; 1227 विद्यार्थी होणार पदवीने सन्मानीत
घाणबी येथे कोसळला विजेचा खांब; पाटण महावितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार
“शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: मंत्री चंद्रकांत पाटील

 मुंबई प्रतिनिधी – मुंबई येथील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप लाईगर मोबिलिटीने (Liger Mobility) भारताची पहिली सेल्फ बॅलेन्सिग इलेक्ट्रिक स्कूटर (Self Balancing Electric Scooter) या ऑटो एक्सपोत सादर केली. ही स्कूटर स्वतः बॅलन्स करते. त्यामुळे तुम्हाला पाय टेकवण्याची गरज पडत नाही. म्हणजे दुचाकी वाहन चालवताना ज्यांना तोल जाण्याची सतत भीती वाटते, त्यांना ही स्कूटर फायद्याची आहे. त्यातच ही इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने पेट्रोलवरील वाढत्या खर्चाचीही चिंता करण्याची गरज नाही. कंपनीने ही स्कूटर दोन मॉडेलमध्ये उपलब्ध केली आहे. Liger X आणि Liger X+ असे दोन मॉडेल आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरचे वैशिष्ट्ये म्हणजे तोल सांभाळणारी ही भारतातीलच नाही तर जगातील पहिली स्कूटर आहे. या स्कूटर्समध्ये ऑटो बॅलेन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. वेग कमी असला तरी ही स्कूटर तुम्हाला पडू देत नाही.

COMMENTS