बॉलिवूड मधून एक वाईट बातमी समोर येत आहे. अनेक सिनेमांसाठी ज्यांनी गाण्यांचं लेखण केलं त्या प्रसिद्ध गीतकाराचं निधन झालं आहे. गीतकार नासिर फराझ या
बॉलिवूड मधून एक वाईट बातमी समोर येत आहे. अनेक सिनेमांसाठी ज्यांनी गाण्यांचं लेखण केलं त्या प्रसिद्ध गीतकाराचं निधन झालं आहे. गीतकार नासिर फराझ यांचं निधन झालं आहे. ज्यामुळे कलाविश्वात खळबळ माजली आहे. नासिर फराझ यांनी २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काईट्स’ सिनेमातील ‘दिल क्यों मेरा शोर करे’ आणि ‘जिंदगी दो पल की’ या गाण्यांचं फक्त लेखणच केलं नव्हतं तर, त्यांनी या दोन प्रसिद्ध गाण्यांना आवाज देखील दिला. याशिवाय नासिर फराझ यांनी दिवंगत गायक केके यांच्यासोबत ‘बाजीराव मस्तानी’, ‘कृष आणि काबिल’ यांसारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली.
नासिर फराझ यांच्या निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही. नासिर फराझ यांचे मित्र आणि प्रसिद्ध गायक मुज्तबा अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार नासिर फराझ यांना हृदया संबंधी काही आजार होते. ७ वर्षांपूर्वी त्यांची सर्जरी देखील झाली होती. रविवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखत होत होतं. पण तरी देखील नासिर फराझ रुग्णालयात गेले नाहीत. अखरे रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांचं निधन झालं. निधनानंतर बॉलिवूड आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी नासिर फराझ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सध्या नासिर फराझ यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नासिर फराझ हे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार होते. त्यांनी काइट्स, कृष यांसारख्या हीट सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या काबिल आणि २०१७ साली प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी सिनेमासाठी त्यांनी एकापेक्षा एक गाणी लिहिली.
COMMENTS