श्रीरामपूर/प्रतिनिधी ः माणूस हा प्रगतीचा सदैव मार्ग शोधतो.तो सुखाचा शोध घेतो .खरे सुख हे चांगल्या कर्मात असते.शिर्डीच्या साईबाबांच्या कृपने आणि प
श्रीरामपूर/प्रतिनिधी ः माणूस हा प्रगतीचा सदैव मार्ग शोधतो.तो सुखाचा शोध घेतो .खरे सुख हे चांगल्या कर्मात असते.शिर्डीच्या साईबाबांच्या कृपने आणि प्रामाणिक कर्माने शिर्डी -काकडी विमानतळाचे काम माझ्या हातून पूर्णत्वास गेले हे जीवनातले समाधान असून त्यातून जगण्याची आनंदनिर्मित झाली, खरी समाधान कमाई झाली असल्याचे भावोद्गार माजी तहसीलदार गुलाबराव पादिर यांनी व्यक्त केली.
इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि शेळके मित्रपरिवारातर्फे श्री गुलाबराव पादिर यांचा कार्य आणि कर्तृत्वाबद्दल सन्मान करण्यात आला. वयाच्या 77व्या वर्षात पदार्पण केलेले माजी तहसीलदार गुलाबराव पादिर यांनी काकडी विमानतळ होण्यासाठी अपार परिश्रम आणि कौशल्याचा वापर केला. शेती आणि सामाजिक कार्यातील त्यांचे निरपेक्ष सेवाशील योगदान गौरवास्पद आहे. यानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी श्री पादिर बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून समर्पित व्यक्तिमत्वे आणि आजचा समाज याविषयीं मनोगत व्यक्त करून पादिर परिवाराचा आदर्श सांगितला. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी श्री गुलाबराव पादिर यांच्या माणुसकीसंपन्न जीवनाचा परिचय सांगून सामाजिक कार्यातील आणि काकडी विमानतळ निर्मिती कार्याचे अपूर्व योगदान सांगितले. मीराबाई पादिर,शशिकांत पादिर यांनी असा सन्मान हा आमच्या जीवनातला खरा आनंद असल्याचे सांगून नियोजन केले. अॅड, सागर पादिर, आकाश पादिर, इंजिनिअर कु. मृदला पादिर, कु.वरदलक्ष्मी पादिर या सर्वांचे प्रेम आणि ज्ञानवाटेवरची प्रगती असे सांगून पादिर यांनी आपल्या जीवनात खरे समाधान परिवाराच्या प्रगतीत आणि समाजाच्या कामात आपण शोधतो.सत्कारातून सत्कार्य करण्याचे याही वयात बळ मिळते असे सांगितले. माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ,आरोग्यमित्र भीमराज बागुल यांनी मनोगत व्यक्त करून पुस्तके, शाल देऊन श्री पादिर यांचा सन्मान केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर शशिकांत पादिर यांनी आभार मानले.
COMMENTS