Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोजनेवाडी येथे संविधान भवनाचे भूमिपूजन

अकोले प्रतिनिधी ः जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या हस्ते अबीतखिंड (भोजनेवाडी) तालुका अकोले येथे संविधान सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण

आता विश्‍वात्मके देेवे…गृहिणीने हाताने लिहिली ज्ञानेश्‍वरी.
सत्कार्याच्या कार्याचा सत्कार होतो तेव्हा सेवेला बळ मिळते – प्राचार्य शेळके
नेवाशात तिघांची 35 लाखांची फसवणूक

अकोले प्रतिनिधी ः जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या हस्ते अबीतखिंड (भोजनेवाडी) तालुका अकोले येथे संविधान सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. आदर्श माता कै. बुधाबाई नामदेव भोजने यांच्या स्मृतीदिनी शनिवार 7 जानेवारी 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संविधान भवन या नियोजित इमारतीचे भूमिपूजन जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, हभप ज्ञानेश्‍वर महाराज वाबळे (आळंदी) यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अबिटखिंड, भोजनेवाडी,ता. अकोले, जि. अहमदनगर येथे मातोश्री बुधाबाई भोजने यांच्या स्मृती दिना निमित्ताने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा माजी आमदार बाळासाहेब दांगट व ह.भ.प ज्ञानेश्‍वर महाराज वाबळे, संविधान सैनिक संघ, चे संस्थापक अध्यक्ष डॉ रवींद्र जाधव यांचे हस्ते जीवन गौरव, आदिवासी भूषण, संविधान गौरव अशा विविध पुरस्कारांने मान्यवरांना गौरविण्यात आले. लोकशाहीर भीमराव ठोंगिरे ,लेखक साहित्यिक शरद ताजने ,तान्हाजी कर्पे, डॉ एस के सोमण, डॉ सुरेखा जाधव, सुवर्णाताई ठाकरे, संगीता साबळे, राजू जगधने, दिगंबर नवाळे,बोटे सर आदींना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

COMMENTS