Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री बच्चू कडू अपघातात जखमी

अमरावती : राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. या अपघाता

शरद पवार भाजपचा गेम करतील अशी अवस्था
जांभा बु.च्या १०० टक्के पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा – पालकमंत्री बच्चू कडू
आजकाल तृतीयपंथीयही आमदार होतात

अमरावती : राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. या अपघातात बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली. कडू यांना बुधवारी सकाळी हा अपघात घडला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. बच्चू कडू मंगळवारी मुंबईहून अमरावतीला पोहचले होते. बुधवारी सकाळी रस्ता ओलांडताना एका भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने कडू यांना धडक दिली. या अपघातात कडू यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला 4 टाके लागले असून पायालाही मार लागला आहे. कडू यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.

COMMENTS