पढेगांवच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर मुर्तींची प्राणप्रतिष्ठा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पढेगांवच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर मुर्तींची प्राणप्रतिष्ठा

कोपरगाव प्रतिनिधी-वारकरी सांप्रदायाचा वारसा आणि संत विचार गावात रुजवणारे वै.ह.भ.प.पंढरीनाथ महाराज शिंदे यांचे स्मरणार्थ  तालुक्यातील पढेगाव येथे त्या

पतंग उडवतायं जरा जपून, सावधानता बाळगा
BREAKING:अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ यांना घेऊन येणाऱ्यास ५००० बक्षीस |Lok News24
गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या

कोपरगाव प्रतिनिधी-वारकरी सांप्रदायाचा वारसा आणि संत विचार गावात रुजवणारे वै.ह.भ.प.पंढरीनाथ महाराज शिंदे यांचे स्मरणार्थ  तालुक्यातील पढेगाव येथे त्यांचे चिरंजीव सिव्हिल इंजिनियर बाबासाहेब शिंदे आणि त्यांचे इतर बंधुंनी गावाच्या प्रवेशव्दारावर भव्य कमान उभारुन त्यावर पांडूरंग आणि संतांच्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

           सहा लक्ष रुपये खर्च करुन उभारलेल्या या कमानीच्या उद्घाटनास दोन वर्षापासून  कोरोनाचा अडसर येत होता.त्यात आज पंढरपूर येथुन तयार करुन आणलेल्या  माता रुक्मीणी आणि पांडूरंगाची ,प.पू.गंगागिरी महाराज ,प.पू.नारायणगिरी महाराज आणि ह.भ.प.वै.पंढरीनाथ महाराज शिंदे यांच्या मुर्तींची आषाढी एकादशीचे औचित्य साधुन दोन दिवस अभिषेक करुन, टाळ,मृदुंगाच्या गजरात फराळाची पंगत देऊन मोठ्या भक्तीभावाने प्रवेशव्दार कमानीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी समस्त ग्रामस्थ पढेगांव आणि भजनी मंडळ उपस्थित होते.

COMMENTS