Homeताज्या बातम्यादेश

पश्‍चिम बंगालमधून दोन दहशतवाद्यांना अटक

कोलकाता : कोलकाता पोलिसांच्या एसटीएफने पश्‍चिम बंगालच्या हावडा येथून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे दोघेही आयएसआयएस दहशतवादी संघटनेशी संबं

आरोग्य यंत्रणेची कसोटी
शेतकऱ्यांनी थेट पिकवला गांजा आणि अफू | LOKNews24
नऊ वर्षानंतर इस्रो मंगळयान-2 च्या तयारीत

कोलकाता : कोलकाता पोलिसांच्या एसटीएफने पश्‍चिम बंगालच्या हावडा येथून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. हे दोघेही आयएसआयएस दहशतवादी संघटनेशी संबंधीत असल्याचे बोलले जाते. यापैकी एक दहशतवादी एम.टेक.चा विद्यार्थी आहे. त्यांच्याकडून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही आरोपींना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एसटीएफच्या अधिकार्‍याने सांगितले की, गुल मोहम्मद सद्दाम, राहणार आफताबुद्दीन मुन्सी लेन, टिकियापारा, हावडा असे एका आरोपीचे नाव आहे. तो एम.टेकचे शिक्षण घेत आहे. आरोपीचे वडील रेल्वेतून निवृत्त आहेत. तर सईद हुसेन असे दुसर्‍या आरोपीचे नाव आहे. दोघेही पाकिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांतील दहशतवादी हस्तकांशी थेट संपर्कात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. हे दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करायचे. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बराच काळ नजर ठेवली होती. कोलकाता पोलिस एसटीएफच्या पथकाने टिकियापारा येथील आफताबुद्दीन मुन्शी लेन येथून दोघांना ताब्यात घेतले. हे  आरोपी खिदिरपूरमध्ये गुप्त बैठक आयोजित करणार होते. शस्त्रे गोळा करण्याचाही दोघांचा बेत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक लॅपटॉप, 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बँकशाल न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने सध्या दोन्ही आरोपींना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS