मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये पुन्हा 1993 सारखा बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा एक निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र पोल
मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये पुन्हा 1993 सारखा बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा एक निनावी फोन मुंबई पोलिसांना आल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी निनावी फोन करणार्या व्यक्तीला काही तासांतच अटक केली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्ब ब्लास्टची धमकी देणारा हा दूसरा फोन आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये रविारी निनावी फोन आला. फोन करणार्याने मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. मुंबईत माहीम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये हे बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यात हे स्फोट होणार आहे. हे स्फोट करण्यामागे काँग्रेस आमदार असल्याचे धमकी देण्यार्याने सांगितले होते. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. धमकी देणार्याने शनिवारी रात्री पोलिस कंट्रोल रूममध्ये फोन केला. पुढील दोन महिन्यात त्याने मुंबईत बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली. 1993 साली मुंबईत दंगली झाल्या होत्या. त्याच पद्धतीने पुन्हा दंगली होणार असल्याचे धमकी देणार्याने म्हटले आहे. एव्हढेच नाही तर दिल्ली प्रमाणे मुंबईतही निर्भया प्रकरण होणार असल्याचे आरोपीने फोनवर सांगितले. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. फोन आल्यानंतर मुंबई एटीएस, मुंबई क्राइम ब्रांच यांनी निनावी फोन करणार्या व्यक्तीचा तपास सुरू केला. या प्रकरणी संशयिताला अटक केली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.
COMMENTS