राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा – भाजप राज्य प्रवक्ते कुलकर्णी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा – भाजप राज्य प्रवक्ते कुलकर्णी

बीड प्रतिनिधी - भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर कडाडून टीका केलीय. मिटकरी यांनी भाजपा अध

स्पर्धात्मक भाव मुलांचे भविष्य घडवतो ः प्रफुल्ल खपके
राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर महिलाराज
बियाणींच्या हत्येची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

बीड प्रतिनिधी – भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्यावर कडाडून टीका केलीय. मिटकरी यांनी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका केली. माञ मिटकरी यांनी केलेली टीका म्हणजे उडान टप्पू बोलल्यासारखं असून मिटकरी राजकारणाची वैचारिक संस्कृती बिघडवत असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटले आहे. तुषार भोसले यांच्या विरोधात टीका करत असताना वापरलेली भाषा ही एक प्रकारे धमकी दिल्यासारखे आहे. त्यामुळे पोलिसांनी मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप राज्य प्रवक्ते कुलकर्णी यांनी केलीय.

COMMENTS