Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक विमा परिषदेसाठी सुनील कडलग यांची निवड

संगमनेर/प्रतिनिधी ःभारतीय जीवन बीमा निगमचे अभिकर्ता सुनील कडलग यांना प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळ

शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचा लौकिक वाढवा
नेवाशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार
नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री हसन मुश्रीफ

संगमनेर/प्रतिनिधी ःभारतीय जीवन बीमा निगमचे अभिकर्ता सुनील कडलग यांना प्रतिष्ठेचा एमडीआरटी हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा बहुमान प्राप्त झाल्यामुळे ते दि. 25 ते 28 जून या कालावधीत अमेरिका येथे आयोजित जागतिक विमा परिषदेसाठी नॅशविले, टेनेसी, यूएसए. म्युझिक सिटी सेंटर येथे सहभागी होणार आहेत.
सुनील कडलग हे गेल्या 26 वर्षापासून म्युच्युअल फंड वितरक, जीवन व मेडिक्लेम विमा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. येथील कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक सेवा दिली आहे. समाजामध्ये अर्थसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्रभर ते व्याख्याने देतात आणि वृत्तपत्रांमधून लेखनही करतात. जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह, संगमनेर येथील रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्‍वस्त, रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे संचालक अशा विविध संस्थांच्या माध्यमातून सुनील कडलग हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. जागतिक विमा परिषदेसाठी पात्र होण्यासाठी कडलग यांना भारतीय जीवन बीमा निगमचे शाखाधिकारी महेश कांबळे, शाखाधिकारी विक्रय शरद मेने, शाखाधिकारी अकोले रवि रत्नपारखी, उपशाखाधिकरी मंगेश ठाकूर, विकास अधिकारी गणेश कवडे, पालघर येथील नारायण गिरासे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सुनील कडलग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS