Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू

720 पदांसाठी 66 हजार अर्ज दाखल

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहर पोलिस पदासाठी होणार्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पोलिस शिपाई पदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज आले असून चालकप

केम येथे शेतीच्या वादातून तरुणाचा खून
पुणे शहरात तब्बल 206 सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
केजरीवाल सत्तेच्या नशेत धुंद ! : अण्णा हजारे

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहर पोलिस पदासाठी होणार्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पोलिस शिपाई पदासाठी तब्बल 66 हजार 142 अर्ज आले असून चालकपदासाठी 6 हजार 843 अर्ज आले आहेत. इतर जिल्ह्यांतील भरती प्रक्रिया ही जानेवारी महिन्यात होत आहे. पुण्यात होणारी जी-20 परिषद, नुकताच झालेला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम, पोलिस क्रीडा स्पर्धा, 26 जानेवारी पोलिस परेड यासह विविध कार्यक्रमांमुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा सध्या ताण आहे.
पुणे शहर पोलिस दलातील 720 शिपाई पदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण 66 हजार 142 अर्ज आले आहेत, तर चालक पदासाठी 6 हजार 843 जणांनी अर्ज केले आहेत. चालक पदाची भरती वेगळी होईल, असेही सांगण्यात आले. अनेक उमेदवारांनी दोन ठिकाणी शिपाई पदासाठी अर्ज केले आहेत. मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना दोन्ही ठिकाणी वेळ मिळू शकतो. मात्र, मुंबई वगळता बहुतांश जिल्ह्यांतील पोलिस भरतीची लेखीपरीक्षा एकाच दिवशी होण्याचा अंदाज आहे. पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी तृतीयपंथीय उमेदवारांचे दहा अर्ज आले आहेत. मात्र, या वर्षीपासून तृतीयपंथीयांसाठी काही जागा राखीव ठेवल्या आहेत. यामुळे तृतीयपंथीना सर्व प्रक्रिया पूर्ण करून भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात आले. 720 शिपाई पदासाठी पुरुष व महिला यांच्यासह तृतीयपंथीय उमेदवारांचे एकूण 66 हजार 142 अर्ज आले आहेत. सदर भरती प्रक्रियेला सोमवारी सुरुवात करण्यात आली असल्याचे पुणे शहर उपायुक्त रोहिदास पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले.  महाराष्ट्रातील बहुतांश घटकात पोलिस भरती प्रक्रिया चालू असुन, मैदानी चाचण्या सोमवार (2 जानेवारी) पासून सुरू करण्याचे आदेश झाले आहेत. पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकामध्ये वर्षाच्या शेवटच्या दिवशी आणि नव्या वर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. सदर बंदोबस्तानंतर पोलिस भरतीची तयारी करावयाची असल्याने पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकाच्या आस्थापनेवरील पोलिस भरती दिनांक 6/01/2023 रोजीपासून पोलिस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण या घटकामध्ये ऑनलाइन अर्ज दाखल केलेले आहेत त्यांनी याबाबत नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या भरतीसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत.

COMMENTS